मराठी कविता

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya marathi kavita vachayala miltil. Kavitecha aashay tumhala samjel ashi asha ahe.

एकदा एक भावना शब्दांत अडकली

एकदा एक भावना शब्दांत अडकलीनकळत एका मनाच्या दारावर धडकली खूप वाट पहिली पण दार नाही उघडलंनिराश होऊन परतताना स्वास्थ्य मात्र बिघडलं शब्दावाटे मनाकडे रोजचा प्रवास सुरु झालाप्रत्येक वेळी पदराशी मात्र वाईटच अनुभव आला रोजची कसरत, रोजची धावपळ, रोजची असायची घाईज्या…

Read Moreएकदा एक भावना शब्दांत अडकली

सांगू दे थोडं शब्दात

सांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता कळत नकळत झालेला भावनांचा गुंता एखाद दोन भेटी,…

Read Moreसांगू दे थोडं शब्दात

पुन्हा पुन्हा

चिंब ओल्या पावसात घेऊन हाती तुझा हात चालावे वाटते पुन्हा पुन्हा बट बाजुला सारून डोळ्यात तुझ्या डोळे भरून पाहावे वाटते पुन्हा पुन्हा बहरले सुंदर वन मद मोहक तुझे यौवन न्याहाळावे वाटते पुन्हा पुन्हा इंद्रधनु मेघांत खट्याळ गळ्यात तुझ्या मिठीची माळ…

Read Moreपुन्हा पुन्हा

ती

परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली, ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली मी निर्लज्ज झालो तिच्या सोबत गेलो दिशा तिच पण वाट नवी होती, धागा तोच पण गाठ नवी होती सृष्टी तिच पण भास नवा होता, आयुष्य तेच पण श्वास…

Read Moreती

आवडतं मला

तुझं लपून उगाचच हसणं तुझं शुल्लक गोष्टीवरून रुसणं तुझं दिवसरात्र काळजी करत बसणं आवडतं मला तुझं नजरेतच सुंदर लाजणं तुझं चांदण्या बघत निजणं तुझं प्रीतीच्या पावसात चिंब भिजणं आवडतं मला तुझं बोलता बोलता बावरणं तुझं मनातल्या भावनांना सावरणं तुझं प्रेमात…

Read Moreआवडतं मला

प्रीत जुळता जुळता

प्रीत जुळता जुळता जुळावी प्रेमाची नाती स्नेहाच्या सौम्य सरींनी भिजावी मनाची माती भावनांची उमलावी कळी दरवळावा ओढीचा सुगंध गोड क्षणांच्या आठवणीने चेहऱ्यावर फुलावा आनंद सरावे शंकांचे मेघ आशेचा इंद्रधनु उमटावा शमावे भीतीचे वादळ प्रेमाचा विजय व्हावा

Read Moreप्रीत जुळता जुळता

नेहमीच पाहिले मी

उमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप तुझ्या श्वासांवर प्रेम उत्स्फुर्त अतुट मौनास…

Read Moreनेहमीच पाहिले मी

कॉर्नर

कॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती कैंटिनच्या गर्दित तिला शोधण्याचा खेळ कधी संपला आठवत नाही…

Read Moreकॉर्नर

स्वप्न म्हणजे

स्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं स्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची स्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं स्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची स्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर स्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची स्वप्न म्हणजे आठवण, पाणावल्या डोळ्यांची स्वप्न म्हणजे वेदना, तुटलेल्या…

Read Moreस्वप्न म्हणजे

रम्य पहाट

हटता रात्रीचे पांघरून जागा झाला नारायण लाल केशरी रंगांनी त्यानं सजवलं जग पक्ष्यांनाही जाग आली गाईने हंबरडा फोडला कोकिळेने ताण दिली चिमण्यांनी सुर धरला झाडांना पालवी फुटली कळ्यांची फुले झाली नव्या दिवसाची सुरुवात रम्य पहाटेने केली अंगणात सडा पडला माती…

Read Moreरम्य पहाट