राहूनच गेलं

खूप बोलायचो आम्ही, गप्पाही खूप रंगायच्या
पण तिला बोलताना पहायचं राहूनच गेलं

खूप करायचो मस्करी, हसणंही खूप व्हायचं
पण तिला हसताना पहायचं राहूनच गेलं

कधी कधी गालातली गालात लाजायचोही
पण तिला लाजताना पहायचं राहूनच गेलं

असायचो जवळ एकमेकांच्या, तिची सोबतही असायची
पण तिचा हात हातात घ्यायचं राहूनच गेलं

खूप केला प्रयत्न तिला विसरायचा, त्यात यशस्वीही झालो
पण तिच्या आठवणी पुसून टाकायचं राहूनच गेलं

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply