रंगहिन वाटे चित्र सारे

रंगहिन वाटे चित्र सारे
हरवल्यात सगळ्या रंगछटा

धुसर दिसती सर्व दिशा
काळोखात निजल्या सगळ्या वाटा

मी आता केवळ एका
निश्चल सागरा सारखा
शमल्या आहेत सगळ्या लाटा

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply