विसरावं कधीतरी वास्तव

विसरावं कधीतरी वास्तव
थोडसं स्वप्नातही जगावं

पापण्यांना वर सरसावून
क्षितिजापलिकडे बघावं

एका ओझरत्या नजरेनं
सारं चांदनं
स्वतःमध्ये सामावून घ्यावं

स्वतःच पाउस होउन
त्यांच्या आठवणीत
मनसोक्त बरसून जावं

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply